Office च्या building भोवती नेहमी पारव्याची पंख पडलेली असतात ! उगाच पडत असतील अस वाटायच.
आज दुपारी building खाली उतरलो होतो (कश्यासाठी हे पण जगजाहिर).
परतताना काही घडले ! ते अजुन समजत नाही!
मी परतताना! पारव्याच पिल्लू वरून खाली समोरच थोड्या अंतरावर पडल. ते घारीच्या पंज्यातुन सुटुन खाली पडल होत.
घारही मागोमाग आली. मला काही समजण्याच्या आतच माझे हात वर झाले.घार उडून वर जावून बाजूला असलेल्या खांबावर जाउन बसली. घाबरलेले ते पिल्लू मलाही बघून घाबरल असाव ! उड़ता येत नव्हत त्याला. लगबग करून ते रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वेलीत जाऊन दडून बसल.
Watchman पण पळत आला. तो ही माझ्याकडे पाहून हसला! मी तसाच पुढे निघालो.
थोडा थबकलो ! मागे वळुन पहिल आणि घारिकडे लक्ष गेल. तिचा डोळा अजूनही त्या पिल्लावरच होता. नाही रहावल, परत वळलो आणि त्या पिल्लाला वेलित शोधल. त्याची त्यातही धडपड चालूच होती. शेवटी अलगद धरल त्याला, घाबरलेली त्याची स्पंदने हाताला जाणवत होती.
building च्या समोरच्या भागात थोडी पोकळी जागा आहे आणि वरती KTM च showroom! तेथे watchman ही असतो आणि थोडी रहदारी पण ! सोडल तिथे त्याला. आश्वस्त होऊन परत निघालो घारिकडे पाहिल आता ती माझ्याकडे बघत होती. नजेरेला नजर भिडते अगदी तसच काही झाल ! माझ्या मनात राग नव्हता अगदी काहीच भाव नव्हता.पण दया आली तिची.
मी office मध्ये गेलो, आणि आपल काम आपली दुनिया सुरु झाली.
घरी परतताना मात्र विचार खुप येउ लागले! मी चांगल काम केल की वाइट. तस मी एका जिवाला वाचवल पण एका जिवाच पोट मारून.
ते वेलीतच सुखरूप राहिल असत मी त्याला उगाच पुढे नेवून टाकल. तिथे लवकर मेल तर.
आणि ते पिल्लू तिथे किती दिवस जीवंत राहिल! तसा मी किती कोम्बडया फस्त केल्या मला आठवत पण नाही(नुकताच vegetarian झालोय ). मग मी का वाचवल त्या पिल्ल्याला. आणि मला आनंद का होत होता.
कळल नाही !
-J speaks…

