सोंगटा !

भाव हीच एक भाषा,
मी अन् माझी प्रश्नमंजुषा…

आपुलीच आपणा ठाव,
न लागे जगाला सुगाव…

कधी लागते लगाम,
कधी माजते तमाम…

त्यातलेच ते आपले सर्व,
आपुल्या ठाई साठला गर्व…

अनोळखी न मी एकटा,
सर्व जाणता पदरी सोंगटा…

— कृष्णमेघ