परके मन !

निमित्त कोणते,
ते दरवेळीचे,
आपलेच सोहळे,
आपणच केले,
सांगु कसा मना…

तू असाही असह्य,
मानुनी आप प्रिय,
दोनवेळी दोन काळी,
उरल्याचीच होळी,
सांगु कसा मना…

तू असल्याची ग्वाही,
मजवाचुन दुजी नाही,
तरी तूच उरतोस,
माझेच ते करतोस,
सांगु कसा मना…

तु असुनी माझा,
जाणुन वेगळा,
कोण आपला,
कोण परका,
सांगु कसा मना…

–कृष्णमेघ