मना ओळख दे रे…

मी बोलतो थोडेच,
थोडे भावही दे रे,
मना मोकळीक दे रे…

मी जसा कोडेच,
थोडे ज्ञानही दे रे,
मना मोकळीक दे रे…

तू हवास नेहमी,
तू आप गोडी,
मना आपुलकी दे रे…

मी माझे म्हणतो,
तू स्वच्छंद वागतो,
मना ओढ ती दे रे…

आलो असाच
आलो असाच,
मना भानही दे रे…

ही खुण आपली,
चौफेर नांदली,
मना ओळख दे रे…
मना ओळख दे रे…

–कृष्णमेघ