व्याप्त !

ती ओळ ओळखीची,
ओठी आली…

मी नाहीच बोललो,
पण ती बोलून गेली…

ती झुळुक ये-हविची,
स्पर्षुन गेली…

मी गंधात हरवलो,
ती गंध झाली…

ती नजर नजरेची,
नजरी आली…

मी बघत राहिलो,
ती नजर झाली…

ती हौस ऐकण्याची,
ऐकवुन गेली…

मी ऐकत राहिलो,
ती ते गीत झाली…

ती जाणीव जाणीवेची,
जाणवुन गेली…

मी काच उरलो,
ती जाणीव झाली…

–कृष्णमेघ