मनाचे लोक…!

मनाचे श्लोक या मुळ रामदासांच्या अप्रतीम रचनेचे हे विडंबन आहे. जे सद्य परिस्थितीचे सर्वभूत द्योतक भासते.
(मुळ रचना ही नेहमी उच्च व आदरणीय आहे.)

“मनाचे लोक”

मना सज्जना लोक म्हणावे ।
आपले आपण बघावे ।।

तू एवढा मी एवढा म्हणावे ।
कोण तू असेच वागावे ।।

जे आपले वागले आपले म्हणावे ।
लाजही विसरुन जावे।।

स्वार्थ हेची परमार्थ जाणावे ।
बाकी जग विसरुन जावे ।।

सर्व ते पैश्यात मोजावे ।
उरले विसरुन जावे ।।

हेच एवढे आयुष्य पहावे ।
बाकी थोतांड म्हणावे ।।

-J speaks…

Leave a comment